breaking-newsराष्ट्रिय

…तर निजामाप्रमाणे ओवेसींनाही हैदराबादमधून पळावं लागेल : योगी

तेलंगणामध्ये भाजपा सत्तेत आल्यास ज्याप्रमाणे निजामाला हैदराबाद सोडून पळ काढावा लागला त्याप्रमाणे असदुद्दीन ओवेसी यांनाही हैदराबादमधून पळ काढावा लागेल, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तेलंगणातील विकराबादमधील तंदूर विधासभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली.

View image on Twitter

ANI

@ANI

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Hyderabad: If BJP comes to power I assure you Owaisi will have to flee from Telangana the same way Nizam was forced to flee from Hyderabad.

3,316 people are talking about this

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. अयोध्येत राम मंदिर बांधायला काँग्रेसची आडकाठी आहे. काँग्रेस पक्ष कुणासाठी काम करतोय हे आपल्याला आधी समजून घ्यावे लागेल.काँग्रेस आणि टीआरएस हे दोन्ही पक्ष मुस्लिमांसाठी काम करणारे पक्ष आहेत. धार्मिक आधारावर ते योजना बनवतात, असा गंभीर आरोप काँग्रेसवर करताना भाजपा सर्वांना सुरक्षा देण्याचे काम करणार असून कोणालाही अराजकता माजवण्याची परवानगी देण्याचे काम करणार नाही. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या साडे चार वर्षात ‘सबका साथ, सबका विकास’, हाच कार्यक्रम हाती घेतला आहे, असेही योगी म्हणाले.

तेलंगणात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी होईल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button