breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमध्ये महापालिकेची शाळा कात टाकतेय

  • यंदा शैक्षणिक वर्षात पावणे दोनशे विद्यार्थी पटसंख्येत वाढ

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे निलख येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. महापालिका शाळेत सुसज्ज ग्रंथालय, ई-लर्निग, रेनवाॅटर हार्वेस्टिंग, वैज्ञानिक प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, स्पिकर संच या उपलब्ध केल्याने यंदाच्या सन 2018-19 शैक्षणिक वर्षापासून 175 हून अधिक विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे, अशी माहिती नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.

पिंपळे निलख शाळा प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी आज (सोमवारी) करण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून नगरसेवक तुषार कामठे व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी शाळेतील सुभोभिकरण कामाची पाहणी त्यांनी केली. गतवर्षीच्या बजाज इनिशिएटिव तर्फे आयोजित स्पर्धेत पिंपळे निलख शाळेने चित्रकला प्रकल्प, पथनाट्य स्पर्धेत शहर पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला.

फिल्टम आॅटोकाॅम्प प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सीएसआर निधीतून ओव्हरहेड प्रोजक्टर प्रत्यके वर्गात साऊंड सिस्टीमची सुविधा दिली आहे. मेट्रोपोलिस लायन्स क्लब तर्फे हाॅलमध्ये साऊंड सिस्टीमसाठी लोखंडी स्टॅण्डची सोय करुन दिली. इसीएकडून रेनवाॅटर हार्वेस्टिंग बसवण्यात आले आहे.

अक्षरभारती इनिशिएटिवकडून दहा संगणक, ई लर्निंग, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य, स्पिकर संच भेट दिले आहे. तसेच नगरसेवक तुषार कामठे यांच्या प्रयत्नातून सुसज्ज शालेय मैदान करण्यात आले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून नाविण्यपुर्ण विज्ञान केंद्राची उभारणी, रीड संस्थेने ग्रंथालय करण्यात आले.  यंदाच्या वर्षापासून अबॅकस व इंग्लिश क्लासेस सुरु करण्यात येणार आहेत. तर योगा क्लासेसही सुरु केले आहेत.

दरम्यान, पिंपळे निलख महापालिकेच्या शाळेतील विविध बदलामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढून दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button