breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचा-यांचा पालिकेच्या विरोधात ‘थाळीनाद’

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा उचलणे, सफाईकाम करणा-या महिला कर्मचा-यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे 1600 महिला कर्मचा-यांनी महापालिकेसमोर थाळीनाद आंदोलन केले.

कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष राहुल डंबाळे, अजय लोंढे, भारत मिरपगारे, भिमा कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साळवे यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे, मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, संगीता जानराव, मंगल तायडे, सविता लोंढे, प्रमिला गजभारे, अरुणा पवार, रुक्मिणी कांबळे, जयश्री धोत्रे, आशा पठारे आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, सणासुदीच्या काळात थाळी बडविण्यास पालिका प्रशासनाने आम्हाला भाग पाडले आहे. यातून प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट होत असून प्रशासनाच्या या लहरी कारभारामुळे सफाई कामगारांवर ऐन दिवाळीत निराशा ओढवली आहे. विविध मागण्यांसाठी सफाई कामगार महिलांचे हे आंदोलन आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला. 

या आहेत मागण्या

  • गेल्या वीस वर्षापासून सफाई कामगार महिला पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्या सर्व महिलांना कायम सेवेत घेण्यात यावे.
  • कामगार कायदा नियमानुसार दिवाळीनिमित्त पगाराएवढा बोनस मिळाला पाहिजे.
  • कोरोना आपत्ती काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिल्याबद्दल पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.
  • थकीत प्रा. फंड महिलांच्या नावावर मिळावा आणि सर्व महिलांना प्रा. फंड आणि इएसआय या सुविधा मिळाल्या पाहिजेत.
  • घरकुल योजनेत प्राधान्य देऊन सफाई कामगार महिलांना घरकुल मिळाले पाहिजे.
  • किमान समान वेतनाचा मागील फरक मिळालाच पाहिजे.
  • मुलांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे.
  • सफाई कामगार महिला काम करत असलेल्या ठिकाणी डबे ठेवण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था झालीच पाहिजे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button