breaking-newsराष्ट्रिय

विमान प्रवासासाठी केंद्र सरकारची नवी निमयावली

नवी दिली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी आहे. मात्र, परदेशात अडकलेल्या नागरिकांनी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत योजना सुरू असून नियमित शेकडो प्रवासी या योजनेअंतर्गत परदेशातून मायदेशी परतत आहेत. भारतात परतल्यावर त्यांना कोविड प्रोटोकॉलनुसार काही निमय पाळावे लागत असून केंद्र सरकारने या नियमांत आता शिथिलता आणली आहे. यामुळे प्रवाशांचे आगमन आणि त्यानंतरची प्रक्रिया जलद होणार आहे.

ज्या प्रवाशाची ९६ तासांत केलेली कोव्हीड चाचणी निगेटीव्ह असेल अशा प्रवाशाला क्वारंटाइनमधून सवलत मिळणार आहे. यामुळे कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळ किंवा त्यानजिक क्वारंटाइन रहावे लागणार नाही.

तसेच, धर्तीवर भारतातून परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना देश सोडण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल त्यांच्यासोबत पाठवले जाणार आहेत. जेणेकरून तो दाखवून त्यांना विमानतळ सोडण्यास परवानगी मिळेल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांना तातडीने सर्व परवानगी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. दररोज भारतात आगमन करणाऱ्या प्रवाशांना विमानतळातून बाहेर पडण्यास किती कालावधी लागतो त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यात आणखी काय काय सुधारणा करणे आवश्यक आहे त्या केल्या जातील, असे पुरी यांनी सांगितले.

क्वारंटाइन पॉलिसीनुसार याआधी प्रत्येक प्रवाशाला विमान प्रवासानंतर क्वारंटाइन होणं बंधनकारक होते. यात प्रवाशांचा अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होत होता. या प्रक्रियेत मागील काही दिवसांपासून विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडाल्याची दिसून आले आहे. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर क्वारंटाइनची नियमावली शिथिल करण्यात आल्याचे पुरी यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांशी क्वारंटाइनमधून सवलत मिळावी यासाठी हुज्जत घातली आहे.

या सर्व प्रक्रियेने प्रवाशांचा खोळंबा होत होता. त्यामुळे ज्या प्रवाशांची कोव्हीड चाचणी निगेटीव्ह असेल, अशांसाठी क्वारंटाइनमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु झाली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. कोव्हीड निगेटीव्ह रिपोर्ट ऑनलाइन सादर करून प्रवाशांना क्वारंटाइनमधून सवलत मिळवता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button