breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे

केरळ | केरळमध्ये कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. धावपट्टीवर विमान घसरल्याने विमान क्रॅश झालं आणि विमानाचे दोन तुकडे झाले.

हे विमान दुबईहून येत होतं. या विमानात 180 प्रवाशी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान IX1344 क्रामांक आहे. या विमानाने दुबईहून आज (7 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेतली होती. मात्र, संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांवर रनवेवर लँडींग होत असताना रननेवरुन घसरलं. सध्या जखमी आणि मृतांच्या संख्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button