breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला

मुंबई | “अभिनेत्री कंगना रनौत ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जाईल,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. “परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.”

ICMR च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button