breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर प्लँट’साठी पुढाकार!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा संकल्प

विविध प्रश्‍नांसंदर्भात लघु उद्योजकांसोबत बैठक

पिंपरी | प्रतिनिधी

आगामी काळात औद्योगिक पट्टयातील सोलर एजर्नी प्रकल्प, महावितरण, एमआयडीसी यांनी एकत्रितपणे प्रकल्प धोरण ठरवण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी उद्योजक आणि अधिकारी यांना केले. तसेच, हिवाळी अधिवेशनात ‘सोलर प्रोजेक्‍ट’साठी लागणाऱ्या अनुदानासंदर्भात पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे, औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर प्लँट’साठी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे.

पिंपरी- चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याबाबत आवश्‍यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. सोलर प्रोजेक्‍ट उभारणी आणि त्याला येणाऱ्या अडचणीवर काय पाठपुरावा करता येईल? यावर विचार विनिमय करण्यात आला.

यावेळी पिंपरी- चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, नवनाथ वायाळ, संजय सातव, सचिन पाटील, योगेश लोंढे, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड, भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर, आकुर्डी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, उप कार्यकारी अभियंता सागरे, सहाय्यक अभियंता दिवटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उद्योजकांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. यामध्ये फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे. फिडर पीलरमधील खराब पर्ट्स बदलणे. खराब दरवाजे बदलणे. केबल नादुरुस्त वाहन वेळेवर उपलब्ध करून देणे. फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे इंव केबल्स उपलब्ध करून देणे. फिडरवरील विजेचा ताण कमी होऊन तक्रारी कमी होतील. ओव्हर लोड ट्रान्सर्फामरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्‍यक तेवढीच ठेवणे व आवश्‍यक त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसविणे. स्विचिंग स्टेशन्सची संख्या वाढविणे. पूर्वीप्रमाणे भोसरी गावठाण व इंद्रायणीनगर असे दोन सेक्‍शन तसेच दोन असिस्टंट इंजिनिअर अशी कामाची विभागणी करणे या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आल्या.

हेही वाचा – ‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे, ‘या’ दिवशी होणार मुंबईत बैठक

तातडीची कामे मार्गी लावणार : आमदार लांडगे

उद्योजकांनी दोन मागण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत मागणी केली. यामध्ये पेठ क्रमांक 7 व 10 साठी चार बे ब्रेकर बसवून त्यासाठी केबल देणे. त्यामुळे फिडर 1 व 2 वरील अतिरिक्त वीज भार कमी होईल. वारंवार वीज पुरवठा खंडित होणार आहे. कुदळवाडी चिखली औद्योगिक परिसर सध्या मोई फिडरवर असून, तो टाटा फिडरला जोडून देण्यात यावा. कारण मोई फिडर हा ग्रामीण विभागात येतो तसेच या फिडरवर दगडी क्रशर मशिन जास्त असल्यामुळे या फिडरवर वीज खंडित होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. भोसरी उपविभाग क्रमांक २ चे विभाजन करून इंद्रायणीनगर शाखा कार्यालय व भोसरीगाव असे दोन विभाग करावेत, अशी प्रामुख्याने मागणी आहे. या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यासाठी आमदर लांडगे यांनी आश्वस्त केले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील तसेच पिंपरी- चिंचवडमधील महावितरण संदर्भात समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहामध्ये मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 260 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्या माध्यमातून काही कामे आता मार्गी लागणार आहेत. तसेच, उद्योजकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button