पिंपरी l प्रतिनिधी
तरुणीने तिच्या मित्रासोबत काढलेले खाजगी फोटो अज्ञात व्यक्तीने व्हायरल केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. ११) रात्री साडेसात वाजता चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने तिच्या मित्रासोबत काढलेले खाजगी फोटो, व्हिडीओ, व्हाट्सअपवर चॅट केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट, व्हिडीओ कॉलवर बोलत असताना काढलेले स्क्रीनशॉट अज्ञात व्यक्तीने फिर्यादी तरुणी आणि तिच्या नातेवाईकांना व्हाट्सअपद्वारे पाठवून तरुणीचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.