ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

नवस फेडण्यासाठी महिला चक्क झाडाला बांधलेल्या दोरीला उलट्या लटकतात

औरंगाबाद| महाराष्ट्रात गावा-गावात भरणाऱ्या यात्रांचा एक इतिहास आहे. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा या यात्रांच्या निमित्ताने पाहायला मिळतात. अशीच काही प्रथा औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील औराळा गावात लक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळते. नवसाला पावणारी देवी, अशी धारणा असल्याने नवस केलेल्या महिलांनी मंदिराजवळील दोरखंडाच्या झोक्याला उलटे लटकणे अशी ही अजब प्रथा दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने बघायला मिळते.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा येथील लक्ष्मीदेवी यात्रेला परंपरेनुसार चैत्रशुद्ध नवमी दिवशी सुरुवात होते. यावेळी मानकऱ्यांच्या हस्ते लक्ष्मीदेवीच्या गाड्याची पूजा केली जाते. पूजेनंतर तो गाडा मंदिरापर्यंत वाजत गाजत ओढून आणण्यात आणले जाते. लक्ष्मीदेवी ही नवसाला पावणारी देवी आहे अशी तिच्या भक्तांमध्ये धारणा आहे. या धारणेला अनुसरूनअ नवस केलेल्या महिलांना मंदिराजवळील दोरखंडाच्या झोक्याला उलटे लटकवणे अशी प्रथा आहे. तर या यात्रेला औराळा परिसरातील जेहूर, चापानेर, बोलठाण व हतनूर परिसरासह मराठवाड्याचा काही भाग आणि नाशिक जिल्हा व खान्देशातील भाविकांची गर्दी असते.

करोनाचा फटका

दरवर्षी मोठ्या उत्साहात भरणाऱ्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र गेले दोन वर्ष कोरोनाची परिस्थिती आणि प्रशासनाकडून लादण्यात आलेले निर्बंध पाहता ही यात्रा भरलीच नव्हती. पण यावेळी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने आणि प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम भरवण्यासाठी परवानगी दिल्याने तब्बल दोन वर्षांनी औराळा येथील यात्रा भरली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दीही मोठ्याप्रमाणात पाहायला मिळाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button