breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधायक उपक्रम: प्रयत्न सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी किटचे वाटप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील गरजूंना प्रयत्न सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. दिवाळी म्हणजे आपल्या आयुष्यात आनंददीप घेऊन येणारा सण, पण दुर्दैवाने आपल्या समाजातील सर्वांचीच दिवाळी अशी आनंददायी नसते. म्हणूनच प्रयत्न सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अजय अनिलराव मोरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजूंना मदत करण्याचे ठरवले. या मदतकार्यात त्यांना तात्या बापट स्मृती समितीचे विशेष सहकार्य लाभले.

गरजूंना दिलेल्या किटमधे पणती, सुगंधी-तेल, साबन, उठणे, रांगोळी, फराळ इत्यादी वस्तूंचा समावेश होता. रमाबाई नगर वस्ती, रावेत आणि बिजलीनगर वस्ती ह्या ठिकाणी गरजूंना सुमारे २०० किटचे वाटप करण्यात आले.

याउपक्रमात Morya Graphics, Gyani Talks, मोरया कला केंद्र, Jeenal xerox, Optic Network, Sai Papers And Traders, हॉटेल राघवेंद्र, हॉटेल पूर्णब्रम्ह (शाहूनगर) यांचे सहकार्य लाभले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अजय मोरे, अध्यक्ष- तनय महाडिक, ओम डिंगरे, रितिक येरूणकर, जयेश मोरे, सोहम महाडिक, प्रेम शिरसाठ, सुबोध पिंगळे, पार्थ देशपांडे व प्रयत्न सोशल फाऊंडेशनचे सदस्य व सहकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button