breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
रोहित शर्माची ‘खेलरत्न’साठी शिफारस
नवी दिल्ली | टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर मोहर उमटवली आहे.
रोहित शर्मा व्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू यांचीही शिफारस ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी केली गेली आहे. ‘खेलरत्न’ हा भारतीय नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.