breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

विधानसभेवर पुन्हा भगवा फडकविणार – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे

  • राज्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार
  • अजित पवारांना महापालिकेनंतर आता दुसरा झटका दिला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार आहे. युतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधान भवनावर पुन्हा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनो पक्ष संघटनेचे काम करीत रहा, चांगल्या माणसाला कधीही संधी मिळू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व अन्न पुरवठा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष व केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार गिरीष बापट, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महापाैर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे आदी मान्यवर उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीआधी अनेक माध्यमांनी भाजप सत्तेत येणार नाही, त्रिकुंश परस्थिती निर्माण होईल, असे चित्र रंगविले. मात्र, पतप्रधान नरेंद्र मोदीवर लोकांनी विश्वास ठेवून 282 वरुन 306 खासदार संसदेत पाठविले. लोकांनी मी-मी म्हणणा-यांना घरी बसविले. आता ते लोक कोणत्या बिळात जावून बसलेत, ते दिसनासे झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना महापालिकेनंतर दुसरा झटका दिलाय, त्यांचा पराभव पिंपरी चिंचवडकरांनी केलाय, त्यामुळे आता त्यांना झोप देखील लागत नाही.

काॅंग्रेस पक्षाची अवस्था तर बिकट झालीय, पंतप्रधान पदाचा उमेदवार अध्यक्ष पद नको, म्हणायला लागले. तर देशात काॅंग्रेसचा अध्यक्ष व्हायला कोणीही तयार नाही. कारण, ही परिवाराची पार्टी असून यापुढे काॅंग्रेस एक दिवस शिल्लक राहणार नाही. मात्र, भाजपने सोशल इंजिनिअरिंग केले. सर्व समाज घटकांनाबरोबर घेवून त्यांना न्याय दिला. त्यामुळे भाजप सर्व जाती-धर्मांची पार्टी झाली आहे. सर्वांनी पक्षाचे काम करीत रहा, कोणाची संधी कधी चालून येईल, हे सांगता येत नाही. चांगली माणसे आता मिळत नसल्याचेही दानवे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात देखील भाजप-शिवसेनेच्या युतीचे सरकार आणायचे आहे. पक्ष संघटनेच्या जोरावर आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. गोरगरींबाना न्याय देवून त्यांनी गरीबी हटवायची आहे. आता गरीबांना 2022 पर्यंत घरे द्यायची आहेत, त्यांना दोन-तीन रुपयांने धान्य देतोय, घराघरात वीज देवून शंभर रुपयात गॅस दिलाय. वर्षाला 5 लाखापर्यंत आरोग्य सुविधा देवून भाजपने गरीबी हटाव नारा दिला आहे.

यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शहर भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button