breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्यात कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Parineeti-Raghav : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा काल (१३ मे) नवी दिल्ली येथे साखरपुडा पार पडला.  गेल्या काही दिवसांपासून परिणीती आणि राघव एकमेकांना डेट करत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण परिणीती आणि राघव यांनी कधीही सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही. परिणीती आणि राघव त्यांच्या खजी लाईफ बरोबरच त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. तर आज जाणून घेणार आहोत त्यांच्या संपत्तीबद्दल…  

परिणीती चोप्राची एकूण संपत्ती :

अभिनेत्री परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ६० कोटींच्या आसपास आहे. परिणीती सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमाई करते. मुंबईत तिचं आलिशान घर आहे. तसेच परिणीतीला आलिशान गाड्यांची फार आवड आहे. तिच्याकडे ऑडी ए ६, जगुआर एक्सजेएल आणि ऑडी क्यू ५, जगूआर एक्सजेएल सारख्या गाड्यादेखील आहेत.

हेही वाचा – अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या ‘त्या’ प्रकारावर सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या..

राघव चढ्ढाची एकूण संपत्ती :

राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबत एक चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. त्यांनी डेलॉइट, श्याम मालपाणी आणि ग्रँट थॉर्नटन यांसारख्या अकाउंटन्सी फर्ममध्ये काम केलं आहे. डिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ५० लाख रुपये आहे. राघव २०१२ साली आपमध्ये सामील झाले आणि सर्वात तरुण राज्यसभा सदस्य म्हणून ते ओळखले जातात. राघवकडे मारुती स्विफ्ट डिझायर आणि ९० तोळे दागिने आहेत. याची किंमत सुमारे ४,९५,००० रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे ३७ लाख रुपयांचं घर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button