breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधकांनी रचला माझ्या हत्तेचा कट, पोलिसांचा तपास दिशाहीन – दत्ता साने

  • जनसंपर्क कार्यालयाची दोन दिवसांपूर्वी तोडफोड
  • पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा संशय

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील जनसंपर्क कार्यालयाची सशस्त्र तरुणांच्या टोळक्याने तोडफोड केली. त्यावर दत्ता साने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या संपर्क कार्यालयातील हे गुन्हेगारी कृत्य मला मारण्यासाठी विरोधकांनी रचलेले कारस्तान होते. यामागे कोणाचा हात आहे, हे समोर आलेच पाहिजे. पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेज हाती लागूनही पोलिसांचा तपास दिशाहीन झाला आहे. पोलिसांनी दबावाखाली येऊन काम करू नये, अन्यथा पोलिसांनी गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन दिल्याचा संशय समाजात जाईल, अशी खंत दत्ता साने यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी धडाकेबाज चेहरा म्हणून दत्ता साने यांना विरोधी पक्षनेता पद दिले. पदाला साजेसे कामही साने यांनी एक वर्षामध्ये करून दाखविले. अगदी मित्राच्या विरोधात देखील सर्वसामान्य नागरिकांची तक्रार आल्यास तिचे निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे साने यांची प्रतिमा एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून आहे. त्यामुळे विरोधकांनी साने यांचा वाढत चाललेला प्रभाव कमी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी चिखली येथील त्यांचे कार्यालय फोडले. चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने कोयत्यासारखी घातक शस्त्रे हातात घेऊन कार्यालयाची तोडफोड केली.

पोलिसांनी तपासाची सुत्रे स्वीकारली. त्यावेळी साने यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही आणि आजुबाजुच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगारांचे चेहरे स्पष्ट दिसतात. तरी, गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांनी दोन दिवस लावले. हे गुन्हेगारी कारस्तान रचण्यामागील खरा सुत्रधार कोण आहे, हे जाणून घेण्याचा साने यांचा प्रयत्न आहे. परंतु, पोलिसांकडून तपासाची दिशा बदलली जात आहे. त्यामुळे पोलीस माहिती असून ख-या सुत्रधारापर्यंत पोहोचत नसल्याचा संशय बळावत आहे. साने यांनी हा माझ्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर तपासाची प्रक्रिया पार पाडावी, अशी साने यांनी विनंती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button