breaking-newsराष्ट्रिय

विधानसभेला मनसे दोन आकडी जागा जिंकणार; ज्योतिष संमेलनातील भाकीत

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे फायदा होईल अशी भुमिका घेतली होती. त्याचा किती फायदा होईल हे २३ मे रोजी स्पष्ट होईलच. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भरारी घेईल आणि पुन्हा दोन आकडी जागा जिंकेल असे भाकीत नाशिकच्या ज्योतिष संमेलनात व्यक्त करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल असेही मारटकर यांनी म्हटले आहे. येत्या विधानसभेत जनता मनसेला भरभरुन मते देईल त्यामुळे मनसेचे पुन्हा दोन आकडी आमदार निवडून येतील असे त्यांनी म्हटले आहे.

राज यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्याने याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल. राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने त्यांच्यासह शिवसेनेचीही मते त्यांना मिळतील असे भाकीतही करण्यात आले आहे. २०१४ ते २०१९ या काळात राज यांच्या ग्रहांची स्थिती अनुकूल नव्हती त्यामुळे त्यांना या काळात यश मिळवता आले नाही. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती अगदी उलटी असल्याने त्यांना घवघवीत यश मिळू शकते.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाला जागा कमी मिळतील मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असेही भाकीत मारटकर यांनी केले आहे. मोदींची वृश्चिक रास असून सध्या गुरुचे भ्रमण त्यांच्या राशीतून होत असल्याने याचा मोदींना फायदा होणार असल्याचे तसेच राज्यात शिवसेना-भाजपाच्या जागांमध्ये घट होणार असल्याचेही मारटकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button