breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘विधानपरिषदेसाठी १२ जणांची नावे निश्चित’, अनिल देशमुखांची माहिती

जळगाव – राज्यपाल निदेर्शित सदस्यांसाठी म्हणजे विधानपरिषदेवर नियुक्त आमदारांसाठी १२ नावं निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, ही नावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. त्यामुळे योग्य वेळ आली की ती नावं जाहीर केली जातील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते जळगाव जिल्ह्यांतील अमळनेर येथे बोलत होते.

अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजीमंत्री इतर माजी आमदार खासदार आदी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले, विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button