breaking-newsराजकारणराष्ट्रिय

विद्यादान होणाऱ्या परिसरात हल्ले होणे दुर्दैवी- सहाय्यमंत्री धनंजय मुंडे

नवी दिल्ली | महाईन्यूज

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतच आहे. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी-शिक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आहे. विद्यादान होणाऱ्या परिसरात असे हल्ले होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हंटलेल आहे. देशातील तरुण पिढीपुढे हे कसले ‘आदर्श’ निर्माण केले जात आहेत?, अशा अराजकतेचा निषेध म्हणत मुंडे यांनी केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button