breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेएनयू विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा पार्थ पवारांकडून निषेध

नवी दिल्ली | महाईन्यूज

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आली आहे. या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसह क्रिकेट आणि बॉलिवूडमधूनही या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे.

जेएनयुमधील हल्ल्याबाबत देशभरातून संताप व्यक्त होत असून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केलेली आहे. त्यानंतर, अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ”जेएनयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवरील हिंसक हल्ला निंदनीय आहे. सदर हल्ल्याती दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे” अस पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button