ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मोदी सरकारमुळे मंदिराचे स्वप्न साकार झाल्याचा शंकर जगताप यांचा दावा

चिंचवड मतदारसंघातील ४०० रामभक्त अयोध्येकडे रवाना

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून अयोध्येत रामभक्तांची रीघ लागली आहे. शनिवारी (दि. १०) भाजपाच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ४०० रामभक्तांना घेऊन रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड ते लोणावळापर्यंत ‘राममय’ झाले होते. ‘प्रभू श्री राम की जय’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत चिंचवड मतदारसंघातील नागरिक रेल्वेद्वारे अयोध्येला रवाना झाले. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रामभक्त अयोध्येकडे मार्गस्थ झाले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “देशात मोदी सरकार आल्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. २००८ आणि २०११ साली प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. तेव्हा श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले असता, काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर रामजन्मभूमीचे पुरावे दिले गेले आणि राम मंदिर साकारायला परवानगी मिळाली.”

यावेळी माजी नगरसेवक आप्पा बागल, रघुवीर शेलार, निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते सखाराम रेडेकर, नितीन इंगवले, रमेश काशीद, गणेश लंगोटे, लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ कलाक्रीडा अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप, मिलिंद कंक आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button