breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

विकास फक्त पवारांच्याच बारामतीत होतोय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

पुणे: ‘पुणे जिल्ह्यात विकास फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात होत आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आमदारांने आपल्याच पक्षाला घरचाच आहेर दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शरद पवार यांच्या होम पिचवर त्यांच्याच पक्षाचे खेडचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते हे गेले काही दिवसांपासून थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत आहेत. आपण वेगळा विचार करण्याच्या सूचना व सूचक इशाराही त्यांनी दिलेला आहे. मोहिते सध्या आपल्याच नेत्यांच्या आणि सरकारच्या विरोधात बोलत आहेत.

भामा आसखेड धरणाच्या पाण्याबाबत ते आक्रमक झालेले आहे. भीमाशंकर परिसर देवस्थान विकास यावरून ते दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहे. जिल्ह्यातील फक्त दोन तालुक्यातच विकास होत आहे असेही त्यांचं मत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेले आहे. तीन पक्षांचे एकत्र सरकार स्थापन झाल्यामुळे एकाच वेळी खातेवाटप करण्यात आलेले होते. त्यामुळे अनेक इच्छुक हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले होते. खेड तालुक्याला मंत्रिपद कधीच मिळालेलं नाही. त्यामुळे दिलीप मोहितेही नाराज झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button