breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्यातील लेकीचा संघर्ष : बँजो कलावंताची पोर; झोपडीत राहिली; पणतीच्या उजेडात अभ्यास केला!

वाळवा | घरची आर्थिक परिस्थिती बिकट…राहायला झोपडीत…घरी विजेच्या सुविधेचा अभाव…पणतीच्या उजेडात अभ्यास करत नुकत्याच झालेल्या 12 वीच्या परीक्षेत 71 टक्के गुण मिळवुन तिने यश मिळविले. आमच्या ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील योगिता राजेंद्र कांबळे हिच्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वडील राजेंद्र कांबळे कलाकार असून वेगवेगळ्या बँजो ग्रुप मध्ये वाजवून घरचा उदरनिर्वाह करतात. आई सविता शेतमजुरीचे काम करते. तर मोठा भाऊ योगेश कांबळे खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. सर्वांचा पगार जेमतेमच असल्याने कुटुंबाची वणवण होत आहे. पैसे नसल्याने घर बांधता येत नसल्याची खंत वडील राजेंद्र कांबळे व्यक्त करत आहेत. सध्या हे कुटुंब झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत. घरी विजेच्या सुविधेचा अभाव असल्याने नेहमी अंधार असतो. पावसाच्या दिवसात झोपडीत पाणी गळेल अशी परिस्थिती आहे. मात्र याचे कोणतेही निमित्त न करता योगिता कांबळे हिने आपले मन अभ्यासात गुंतविले.

पहाटे 4 वाजता उठून पणतीच्या उजेडात ती अभ्यासाला बसत होती. या बरोबरच दिवसाला शेजारी असणाऱ्या चुलत्यांकडे जाऊन ती अभ्यास करत होती. योगीताने कोणतीही खासगी शिकवणी सुरू केली न्हवती. स्वतःच अभ्यास करून यश मिळविण्याचा ध्यास तिने ठेवला होता. परीक्षेचा निकाल लागला आणि ती 71 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरच्यांनाही समाधान व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button