breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रेल्वेचा दावा,वेळेवर सुरु होणार बुलेट ट्रेन, 60 टक्के भूसंपादन पूर्ण

नवी दिल्ली | बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी अद्याप वाढवलेला नाही. अपेक्षा आहे की, ही हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमध्ये आपल्या निर्धारित वेळेत तयार होईल. मात्र जोपर्यंत 90 टक्के भूसंपादन पूर्ण होत नाही, तोवर ग्राऊंड वर्क, रेल्वे मार्ग तयार करण्याचं काम सुरु होणार नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली आहे.

विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की, अहमदाबाद ते मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडोर प्रोजेक्टसाठी 60 टक्के भूसंपादन झालं आहे. यापैकी 37 टक्के भूसंपादन गुजरातमध्ये तर 23 टक्के महाराष्ट्रात झालं आहे. बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाला महाराष्ट्रात सर्वाधिक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांशी सामंजस्य होऊ शकलेलं नाही. रेल्वेकडून शेतकरी तसेच त्यांच्या संघटनांना अनेक सोयीसुविधा देण्याबाबत आश्वासनं दिली जात आहेत. तसेच जमीनीला पाच पट अधिक पैसे दिले जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
  • मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स
  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात
  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.

बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर

  • मुंबई-अहमदाबाद – 3000 रुपये
  • बीकेसी-ठाणे – 250 रुपये
  • मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) – 3000 रुपयांहून अधिक
  • एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.
  • बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
  • 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button