breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली मेट्रो, बस पूर्ण क्षमतेने सुरू; भूकंपाच्या धक्क्यांनी प्रवासी हादरले

नवी दिल्ली – राजधानी दिल्‍लीत कोरोनाचा कहर हळूहळू ओसरतोय. यामुळे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानंतर दिल्ली सरकारने राज्यात मेट्रो आणि डीटीसी बस १००% क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, आज सोमवारपासून दिल्लीतील बस आणि मेट्रोसेवा पूर्ण आसन क्षमतेने सुरू झाल्या. बस आणि मेट्रोतील प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र तरीही आज पहिल्या दिवशी दिल्ली मेट्रो आणि बस स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

महत्त्वाचे म्हणजे आज आठवड्याच्या आणि प्रवासाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रोच्या विविध स्थानकांवर आज सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर वाहतुकीची गती धीमी करण्यात आली आणि विविध स्थानकांवर मेट्रो गाड्या तातडीने थांबविण्यात आल्या. ही मेट्रोची वाहतूक पूर्ववत होईपर्यंत प्रवासी तब्बल ४५ मिनिटे ते १ तासभर खोळंबले आणि मेट्रो स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये उभे राहून प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे, त्यामुळे केवळ ५० प्रवासी बसून प्रवास करू शकणार आहेत. १००% क्षमतेसह सुरू करण्यात आलेल्या या प्रवासातून कोरोनाचा कहर पुन्हा वाढत तर नाही ना, याचे निरीक्षण पुढील काही दिवस दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. त्यानंतर प्रवाशांची संख्या कमी करायची की परिस्थिती आहे तशी सुरू ठेवायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button