breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उस्मानाबाद : वाणेवाडी शिवारात वीज कोसळून दोन मजूर महिला जागीच ठार

उस्मानाबाद – येथील वाणेवाडी शिवारात गुरूवारी (दि. 21) दुपारी दीडच्या सुमारास वीज पडून दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शालुबाई चंद्रकांत पवार (वय 45) आणि शीतल तुळशिराम घटुकले (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. तर, शामल लहू सरवदे, कौशल्या शेषेराव सरवदे आणि छाया भास्कर सरवदे या तीन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणेवाडी येथील शेतकरी गंगाधर उंबरे यांच्या शेतात वरील पाचही महिला कामाला गेल्या होत्या. गुरूवारी (दि. 21) दुपारी दीडच्या सुमारास आभाळ भरून आल्याने विजांचा कडकडाट सुरू झाला. दरम्यान, शालुबाई आणि शीतल पोत्याचे तळवट डोक्यावर घेऊन शेताच्या बाहेर निघत होत्या. त्यावेळी वीज कोसळल्याने त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत शामल, कौशल्या आणि छाया जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button