breaking-newsताज्या घडामोडी

शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चेहरा जळाला, वाचाही गेली

वर्धा | राज्यातल्या वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणघाट येथे एका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात तरूणी भाजली असून तिला उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान तिचा चेहरा जळला असून तिची वाचाही गेल्याची माहिती समोर येतं आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

विकी नगराळे (27 वर्ष) या नराधमाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपी विकीला पोलिसांनी टाकळघट परिसरातून अटक केली. या हल्ल्यात तरुणी 35 टक्के भाजली असून तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे.

तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीवर भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की आणि पीडित तरुणीचा तीन महिन्यांपूर्वीही बसमध्ये वाद झाला होता. पीडित तरुणीची इच्छा नसताना विक्कीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना देखील कळवलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button