breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय योग दिनानिमित्त भोसरीत योगाची प्रात्यक्षिके; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी

 

पिंपरी – पतंजली योग शहर समिती आणि नगरसेवक विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानच्या वतीने भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथे राष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

भारतमाता व पतंजली ऋषींचे प्रतिमा पूजन, गोमाता पूजनानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे, सहा. आयुक्त मंगेश चितळे, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी, योगेश गवळी, सचिन लांडगे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, माजी नगरसेवक पंडित गवळी आदी उपस्थित होते.

आयुष मंत्रालय (भारत सरकार) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व उपस्थितांना पतंजली शहर समितीचे डॉ. नारायण हुले यांनी मार्गदर्शन केले. योगशिक्षक सुरेश साळुंके, संध्या देशमुख यांनी व्यासपीठावर प्रात्यक्षिके केली. संत साई विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय आणि श्रमजीवी विद्यालय तसेच अन्य दहा ते बारा शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर निरंकारी संस्था, स्वाध्याय परिवार, प्रजापिता ब्रम्हकुमारी या संस्थांच्या साधकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढवळेश्वर शिवलिंग यांनी केली. विलास मडिगेरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन स्थायी समिती विलास मडिगेरी, योगेश गवळी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button