breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पुणे-नाशिक महामार्ग श्रेयवादात आता भाजपा आमदार महेश लांडगेंची ‘उडी’; म्हणे…‘‘हे श्रेय जनतेचे…केंद्र सरकारचे..!’’

पिंपरी । अधिक दिवे

पुणे- नाशिक महामार्गावरील खेड बायपास व नारायणगाव बायपास रस्त्याच्या कामावरुन शिरुर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या श्रेययुद्ध रंगले आहे. आता या वादात भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी उडी घेतली आहे.

खेड घाट व नारायणगाव बायपास रस्त्याचे अधिकृतपणे उद्घाटन  होण्यापूर्वीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्घाटन उरकून घेतले. यावेळी या कामाच्या ‘‘श्रेयाची चोरी करीत वचनपूर्वी करण्याचे थोतांड केल्याचा’’ आरोप आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केला होता.

यावर ‘‘ निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये आढळरावसुद्धा बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी असे उद्घाटन केले आहे. इतक्या वयस्क व्यक्तीने असं वागणं बर नाही, अशी बोचरी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली होती. विशेष म्हणजे, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारसाहेबांचा हात आहे, असे मोठे विधान करुन राजकीय खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कोल्हे- आढळराव यांच्या या वादात उडी घेतली आहे.  ‘‘पुणे- नाशिक महामार्गाचे श्रेय सर्वसामान्य नागरिकांचे… केंद्र सरकारचे..! ’’ असा दावा आमदार लांडगे यांनी केला आहे.

पुणे-नाशिक महामार्गाचे श्रेय सर्वसामान्य नागरिकांचे आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात निवडून दिले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळेच खेड बायपास, नारायणगाव बायपास आणि खेड ते नाशिक फाटा रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लागते आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

कोल्हे, आढळराव आणि लांडगे लोकसभेचे उमेदवार…

शिरुर लोकसभा मतदार सघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात पराभवाचा समाना करावा लागलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे शिवसेनेच्या तिकीटावर याच मतदार संघातून सलग तीनदा निवडून आले होते. आता राज्यात महाविकास आघाडी करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापुढील निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. दुसरीकडे, शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे भाजपाचे तिकीट मिळाल्यास २०२४ मध्ये आमदार लांडगे लोकसभा लढवतील, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, खासदार शिवाजीराव आढळराव यांना महाविकास आघाडीचे तिकीट नाही मिळाल्यास आढळराव भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button