breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड, कस्पटेवस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

एका लहान मुलीवर हल्ला करुन चावा घेतल्याने जखमी

पिंपरी चिंचवड शहराच्या वाकड, कस्पटेवस्ती परिसरात  भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. आज शुक्रवारी एका लहान मुलीवर हल्ला करुन चावा घेतल्याने जखमी झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धाऊन जाणे आणि अचानक वाहनांच्या आडवे येऊन अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांनी भटक्या कुञ्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे केली आहे.

वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिलांना रस्त्यावरून चालताना भटक्या कुत्र्यांची भीती आहे. वाकडमध्ये  काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक लागत असल्याने अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत. भटके कुत्रे मागे लागल्याने दुचाकी चालक वाहने वेगाने चालवतात त्यामुळे अपघात होत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण राहिले नसल्याने त्यांची संख्या वाढतच चालली आहे.

रात्री दहा नंतर शहरातील प्रमुख भागात भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने चालविले की काही कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. कस्पटेवस्ती,  मटण परिसरात कुत्र्यांचा टोळी आहेत. रात्री दहा वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत ही टोळी याठिकाणी थांबून असते. रस्त्याच्या मधेच ठिय्या मारुन ही कुत्री बसल्याने काही वेळेला चार चाकी वाहनधारकांना रस्त्यावरच थांबावे लागते.

 शहरात हजारो कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली. तरीही कुञ्याची पैदास वाढत आहे. मात्र महापालिकेने निर्बिजीकरणाची मोहीम फारशी गांभीर्याने राबविली नाही. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महापालिकेची यंत्रणा आठवडाभरापुरती जागी होती. त्यानंतर ही मोहीम बंद केली जाते. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात श्वान निर्बिजीकरण केंद्र असुन अडचण नसुन खोंळबा अशी स्थिती झाली आहे. शहरातील भटकी कुञ्याचा लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button