breaking-newsताज्या घडामोडी
प्राध्यापिकेला कोरोना, ६५० विद्यार्थ्यांना ठेवलं वेगळं
औरंगाबाद | औरंगाबादेत एक प्राध्यापिकेला कोरोना पोसिटीव्ह आल्यानंतर त्या प्राध्यापिकेच्या ६५० वर विद्यार्थांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. गेली १४ दिवस हे सगळे विद्यार्थी हॉस्टेल मध्येच वेगळे होते.
मात्र गुरुवारी रात्री त्यांचा १४ दिवसांचा विलागीकरण काळ संपला आणि त्यांना मोकळं करण्यात आले, एकही विद्यार्थ्यांमध्ये लक्षण न दिसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.
विदेशातून आल्यावर कोरोनाग्रस्त प्राध्यापीकेने वर्ग घेतले होते. त्यानंतर ही महिला पॉझिटिव्ह झाली होती दरम्यान ती प्राध्यापिका ही आता बरी आहे आणि तिला हॉस्पिटल मधून सुट्टी झाली.