breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘त्या’ शेतकऱ्याच्या पत्नीची तहसीलदारांविरुद्ध पोलिसांत तक्रार

  • २० हजारांची मागणी केल्याचा गंभीर आरोप, शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे प्रकरण

अमरावती |

शेतातील वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी शेतकरी सचिन वाटाणे यांनी सोमवारी नायब तहसीलदारांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात त्यांच्या पत्नी प्रियंका यांनी सायंकाळी तहसीलदार व नायब तहसीलदारांविरुद्ध चांदूर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी २० हजार रुपयाची मागणी करून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.

याबाबत सचिन वाटाणे यांनी तहसीलदार धीरज स्थूल व नायब तहसीलदार सवई यांच्याकडे विनंती करून न्यायाची मागणी केली. त्यावर तुमच्याकडे २० हजार रुपये असेल तर द्या, नंतरच अर्ज मंजूर करून तुमच्या बाजूने निकाल देतो, असे सचिन वाटाणे यांना सांगण्यात आले. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आम्ही मागणी पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे सदर प्रकरण आदेशासाठी प्रलंबित ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप प्रियंका यांनी तक्रारीतून केला आहे. सोमवारी सकाळीसुद्धा २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास तुमचा अर्ज खारिज करण्याची धमकी देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळूनच पती सचिन वाटाणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याला सर्वस्वी तहसीलदार व नायब तहसीलदार जबाबदार असून त्यांनीच माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून कारवाईची मागणी प्रियंका वाटाणे यांनी तक्रारीतून केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने ठाणेदार सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर चौकशी करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button