breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड-कस्पटेवस्तीचा पाण्याचा प्रश्न सुटणार

स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांची माहिती 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाकड, कस्पटेवस्ती परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. त्यामुळे वाकड, कस्पटेवस्ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी नव्याने 25 लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्या टाकीच्या कामासाठी सुमारे 4 कोटी 58 लाख 68 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी दिली. 
स्थायी सभापती ममता गायकवाड म्हणाल्या की,  वाकड-कस्पटेवस्ती परिसरात उभारणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीमुळे भविष्यातील पाणी पुरवठ्यावर ताण येणार आहे. तत्कालीन नगरसेवक विनायक गायकवाड यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पाण्याच्या टाकीसाठी २०१३ पासून निधी मंजूरी पासून ते प्राधिकरणकडून टाकीसाठी जागा हस्तांतरित करण्यापर्यंत विशेष असे प्रयत्न केलेले होते.  तसेच हा पाण्याच्या टाकीचा विषय मार्गी लागला.
या पाण्याच्या टाकीमुळे वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या परिसरातील जुन्या असणाऱ्या पाईपलाईन व लिकेज यामुळे पाण्याची गळती होऊन पाण्याचा दाब कमी होवून पाणीपुरवठ्यावर ताण येवू लागला. त्यामुळे  वाकड-कस्पटेवस्ती परिसरामध्ये अमृत योजनेअंतर्गत नवीन HDPE पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केलेले आहे यामुळे पाण्याची गळती थांबून अनधिकृत नळ कनेक्शनला आळा बसणार आहे.
वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पाण्याचा टाकी मंजूर केली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ह्या २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या एकूण र.रु. रु.४, कोटी ५८ लाख ६८ हजार ०२८ विषयास तत्काळ मंजुरी दिली. पाण्याच्या टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश स्थायी समिती सभेत सभापती ममता विनायक गायकवाड यांनी स्थापत्य विभागास दिले आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button