breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मला प्रसिध्दीची हाव नाही, माझी हयात पिंपरी-चिंचवडमध्ये गेली

  • माजी महापौर मंगला कदम यांचा पलटवार
  • पक्षनेते एकनाथ पवार यांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संभाजीनगर येथील लेझर शोच्या निविदेचा आराखडा तयार करण्यासाठी तीन वर्ष विलंब लावला. नवीन आराखडा अवघ्या पंधरा दिवसांत मंजूर केला. विशेष म्हणजे फाऊंटन कारंजेचा नकाशा एका विशिष्ट कंपनीचा मान्य करून तो प्रसिध्द केला आहे. पूर्वीच्या व आताच्या चालन व देखभाल दुरूस्तीमध्ये तफावत आहे. आणि मला प्रसिध्दी मिळविण्याची गरज नाही. पिंपरी-चिंचवडकरांनी मला मोठी प्रसिध्दी दिलेली आहे. अख्खी हयात शहरात घालवली आहे. त्यामुळे प्रसिध्दीची खरी गरज त्यांनाच आहे, असा पलटवार माजी महापौर मंगला कदम यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर केला आहे.

बर्ड व्हॅली येथील लेझर शोच्या नव्या आणि जुन्या निविदेवरून विरोधी पक्षाच्या माजी महापौर मंगला कदम आणि सत्ताधारी भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवनार यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजपचे रवी लांडगे आदी यावेळी उपस्थित होते.

मंगला कदम म्हणाल्या की, लेझर शोसाठी नौजल हा जर्मन कंपनीचा आहे. आणि पंप केएसबी कंपनीचा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना मर्जीतीलच ठेकेदाराला हा प्रकल्प करू द्यायचा आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली या कामाची निविदा अवघ्या पंधरा दिवसांत कशी मार्गी लागते. त्याचा आराखडा कसा मंजूर केला जातो. विशेष म्हणजे फाऊंटन कारंजेचा नकाशा देखील प्रसिध्द केला आहे. नवीन निविदेनुसार लेझर शो चालन, देखभाल व दुरूस्ती खर्चात तफावत आहे. हा प्रकल्प करताना भाजपने ठराविक ठेकेदारांना समोर ठेवले आहे. आजपर्यंत भाजपचे एकही काम दाखविण्यालायक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काळातील कामे नावे बदलून आम्ही केल्याचे दाखविण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button