breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये विकासकामांचा ‘सपाटा’, आ. जगतापांच्या हस्ते भूमिपूजनाचा ‘धडाका’

  • स्थायी समिती माजी अध्यक्षा ममता गायकवाड यांचा पाठपुरावा
  • नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रभाग २६, वाकड-पिंपळे निलखमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाबरोबरच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 25 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी महापौर राहुल जाधव व स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक तुषार कामठे व संदीप कस्पटे आदी उपस्थित होते.

  • कावेरीनगर येथील २५ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. कावेरी सब-वे ते शौर्य हॉटेल चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक पर्यंतचा रस्ता आणि वाघजाई हॉटेल ते कल्पतरू चौक विशालनगर पर्यंतचा रस्ता देखील काँक्रिटचा बनविण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी वाकड-पिंपळे निलखमधील विकासकामांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. पाण्याच्या टाकीमुळे वाकड-कस्पटे वस्ती परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने ही पाण्याची टाकी होण्याकरता ममता गायकवाड व विनायक गायकवाड प्रयत्नशिल होते. या परिसरात विविध रस्त्यांचे स्मार्ट काँक्रिटीकरण करण्यात येत असून मॉडेल वॉर्डच्या धरतीवर हे रस्ते विकसित करण्यात येत आहे.

  • आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, “या परिसरातील ही सर्व विकासकामे या प्रभागातील नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या मार्फत ही विकासाची गंगा महापालिकेतर्फे या परिसरात येत आहे. ही सर्व विकासकामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button