breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

सॅमसंग कंपनीकडून भारतात दोन नवे स्मार्टफोन लॉन्च

2 जूनला सॅमसंग कंपनी भारतात दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे..याची माहिती फ्लिपकार्टने एका टीझरच्या माध्यमातून दिली आहे. या स्मार्टफोनची नावं आहेत  Samsung Galaxy M11 आणि Galaxy M01. 2 जूनला अधिकृतपणे हे फोन लॉन्च केल्यानंतर ग्राहकांना  खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सॅमसंग कंपनी Glaxy M11 ला Galaxy M10 आणि Galaxy M10s चे अपग्रेड वर्जन असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला Galaxy M01 साऊथ कोरिया कंपनीचा नवं प्रोडक्ट आहे. फ्लिपकार्टवरील दाखवण्याच आलेल्यी टीझरमध्ये हे स्मार्टफोन लॉन्च करण्याची तारीखही देण्यात आली आहे तसेच स्मार्टफोनबाबत सुद्धा सर्व माहिती सांगण्यात आली आहे.

सॅमसंग कंपनीच्या या दोन नव्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग 2जूनला दुपारी  12 वाजता होणार आहे.  स्मार्टफोनच्या किंमतीबाबत मात्र अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. पण हे दोन्ही स्मार्टफोन हे ग्राहकांना बजेटमध्येच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

फिचरस्

Samsung Galaxy M11  

6.4 इंच डिस्प्ले, ऑक्टा-कोर प्रोसेसर, 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात  येणार आहे.

 Galaxy M01

डुअल रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13MP असणार आहे. त्याचसोबत 4,0000mAh बॅटरी दिली जाणार आहे. फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. 5.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असू शकतो. जो वॉटरड्रॉप नॉचसह येण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉमकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसर असू शकतो. त्याचसोबत 3GB RAM, 32GB स्टोरेज आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button