breaking-newsटेक -तंत्र

वनप्लसच्या ‘या’ फोनवर १० हजारांपर्यंत सूट

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. उद्या पासून देशाच्या काही भागांमध्ये पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरवात होणार आहे. पण काळात ऑनलाईन वस्तूंची मागणी वाढली आहे. शिवाय ऑनलाईन कंपन्या अनेक वस्तूंवर सूट देखील देत आहेत. याकाळात  ‘वनप्लस’ या स्मार्टफोन कंपनीने आपल्या बड्या किंमतींच्या मोबाईवर ग्राहकांना आकर्षक ऑफर दिल्या आहेत.  

वनप्लसच्या स्मार्टफोनवर तब्बल १० हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. वनप्लस स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट Amazon इंडिया आणि oneplus.in वरून केली जात आहे.

वनप्लसच्या कोणत्या फोनवर किती रूपयांची ऑफर आहे. हे सविस्तर जाणून घ्या. ही संधी तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. 
OnePlus 7
OnePlus 7 ६ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ३२ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा स्मार्टफोन २९ हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. ८ जीबी रॅम मॉडल ग्राहकांना केवळ ३४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. ऍमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना एसबीआय कार्डवर १००० रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. 

Oneplus 7 Pro
या  फोनवर चक्क १० हजार रूपयांची सूट देण्यात आली आली आहे. ८ जीबी रॅम मॉडल ग्राहकांना केवळ ४२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. यापूर्वी या फोनची किंमत  ५२ हजार ९९९ रुपये होती. फोनचा १२ जीबी रॅम मॉडलची किंमत आता ४८ हजार ९९९ रुपये झाली आहे.  ऍमेझॉनवर एसबीआय कार्डवरून पेमेंट केल्यास १२५० रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट दिले जात आहे. 

OnePlus 7T
OnePlus 7T या स्मार्टफोनवर कंपनीने ३ हजार रूपयांची ऑफर दिली आहे. ८ जीबी रॅम मॉडल ग्राहकांना केवळ ३४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. यापूर्वी या फोनची किंमत  ३७ हजार ९९९  रुपये होती. शिवाय ऍमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना एसबीआय कार्डवर १००० रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. 

OnePlus 7T Pro
OnePlus 7T Pro या स्मार्टफोनवर कंपनीने ६ हजार रूपयांची ऑफर दिली आहे. ८ जीबी रॅम मॉडल ग्राहकांना केवळ ४७ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. यापूर्वी या फोनची किंमत  ५३ हजार ९९९ रुपये  होती. ऍमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना एसबीआय कार्डवर १ हजार २५० रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. 

OnePlus 8
OnePlus 8 चा  ६  जीबी मॉडेलचा स्मार्टफोन तुम्हाला ४१ हजार ९९९ रुपये किंमतीत विकत घेता येणार आहे. ८ जीबी रॅम मॉडल ग्राहकांना केवळ ४४ हजार ९९९ रुपये रुपयांना खरेदी करता येवू शकतो. १२ जीबी रॅम मॉडलची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कार्डवर २ हजार  रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button