breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेस कोअर कमिटीचा राहुल गांधींना सल्ला…

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमंत्रण स्विकारू नका

नवी दिल्ली -काँग्रसेच्या कोअर कमिटीने राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी राहुल गांधी यांना म्हटले की, ‘आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) म्हणजे विष आहे, हे सर्वजणांना माहित आहे. जर तुम्हाला माहित आहे की समोर विष आहे तर ते चाखण्याची गरज नाही आहे. कारण विष  चाखण्याचे परिणाम सर्व जाणतात’.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आरएसएस त्यांच्या विचारप्रणालीचा प्रसार करू इच्छित आहे, त्यामध्ये आपण भागीदार का व्हायचे. त्यांची विचारधारा ही फूट पाडणारी आणि संविधानाच्या जागी मनु स्मृति ला मानणारी आहे’.

यापूर्वी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी म्हटले होते की,  ‘राहुल गांधी  किंवा पक्षाचे अन्य नेते आरएसएस कार्यक्रमात सहभागी होण्यासंदर्भात कोणीच प्रश्न उपस्थित करत नाही’. संघाच्या दिल्लीत होणाऱ्या ‘भविष्य का भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टीकोन’ या कार्यक्रमात राहुल गांधी आणि अन्य विरोधी नेत्यांना आमंत्रित करण्याच्या योजनेविषयी विचारले असता खडगे म्हणाले की, ‘प्रथम आमंत्रण तर येऊ दे’. दरम्यान राहुल गांधी यांना आरएसएस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कडून कोणतेही आमंत्रण मिळाले नाही आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button