breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रात्रभर फोन चार्जिंगला लावताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकते मोठे नुकसान

Phone Charging Overnight : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यावश्यक घटकचं बनला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? मोबाईलचा अति वापर हा आपल्या शरीरासाठी घटक देखील ठरू शकतो. जसे की रात्री झोपताना आपल्या जवळ मोबाईल चार्जिंगला लावून झोपल्यामुळे आरोग्यावर परिणाम तर होतोच. याशिवाय मोबाईलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फोन जास्त वेळ चार्जिंगला लावल्याने फोनचे आयुष्य कमी होते.

रात्री झोपण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावण्याच्या सवयींबद्दल ऑस्ट्रेलियाच्या CQUniversity मधील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजीचे प्रोफेसर रितेश चुघ यांनी माहिती दिली आहे. तर आज आपण तज्ज्ञांनी याबाबद्दल काय मत मंडळ आहे हे सविस्तर जाणून घेऊयात..

रात्रभर फोन चार्जिंगला लावताय तर हे नक्की वाचा!

आजकाल नवनवीन तंत्रज्ञानामुळे टेक्नोलॉजी बदलत चालली आहे. त्यामध्ये मोबाईलचे जनरेशन वेगाने बदलत चालले आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी मोबाईल फोन चार्ज होण्यासाठी तब्बल ४ ते ५ तास लागत होते. मात्र आता आजकालचे फोन चार्जिंग होण्यासाठी अवघे दोन ते अडीच तास लागत आहेत. त्यामुळे आजकालचे फोन स्मार्टफोन झाले आहेत. जे स्मार्टफोन २ तासात चार्ज होतात तेच फोन आपण रात्री झोपताना चार्जिंगला लावतो.

मात्र त्यावेळी त्या फोनला ७ ते ८ तास वीज मिळते. ती गोष्ट फोनच्या बॅटरी हेल्थसाठी फार धोकादायक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्यास फोनच्या बॅटरीची हेल्थ खराब होते आणि फोनची बॅटरी लवकर बिघडते. त्यामुळे जर तुम्ही रात्रभर फोन चार्जिंगला लावत असाल तर ते आत्ताच थांबवा.

हेही वाचा – ‘ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो’; ठाकरे गटातील नेत्याचं विधान 

तुम्ही फोन चार्जिंगला लावून झोपत असाल तर ते वेळीच थांबवा!

स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर फोनची क्षमता कंपनीने नमूद केल्याप्रमाणे तेवढा वेळ चालते. मात्र आपण स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. तसेच ही गोष्ट वारंवार होत असेल तर ही समस्या फोन जास्त वेळ चार्ज केल्यामुळे उद्भवते. आत्ताचे स्मार्टफोन हे लिथियम-आयन बॅटरीसह येतात त्यामुळे स्मार्टफोनला पॉवर मिळते. परंतु अति जास्त प्रमाणात चार्जिंगचा परिणाम मोबाईल बॅटरीच्या आरोग्यावर होतो.

यासह अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होते यासह जर तुम्हीही रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपत असाल तर चार्जर देखील गरम होते. यामुळे तुमच्या स्मार्टफोनला धोका निर्माण होऊ शकतो.

स्मार्टफोन चार्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :

  • जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी २० टक्क्यांवर आली असेल तर अति जास्त फोनचा वापर करू नका. तसेच फोनची चार्जिंग २० टक्क्यांवर आल्यावर सोशल मीडियावर वेळ घालवू नका.
  • तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोनची चार्जिंग पूर्णपणे संपवू नका. यामुळे तुमचा फोन पूर्णतः बंद होऊ शकतो. मोबाईल पुन्हा चालू होण्यास समस्या येऊ शकतात.
  • कोणताही स्मार्टफोन चार्ज करताना ८० टक्क्यांपर्यंतच करा. जेणेकरून बॅटरीचा बॅकअप जास्त वेळ टिकतो.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर फोन चार्जरपासून वेगळा करा. जेणेकरून बॅटरीचे आयुष्य जास्त दिवस टिकते.
  • जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी ७५ टक्क्यांपर्यंतच करत असाल तर तुम्ही चार्जेर बंद करा. यामुळे फोनची बॅटरी जास्त काळ चांगली राहण्यास मदत होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button