breaking-newsपिंपरी / चिंचवड

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने स्वागत 

पिंपरी –  लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते आज रविवारी (दि.8) स्वागत करण्यात आले.
क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोष्टाचे तिकीट या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रमासाठी आल्या आहेत, त्यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पहार देऊन त्यांचे सत्कार आणि स्वागत करण्यात आले.
राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे, सचिन काळभोर आदि यावेळी उपस्थित होते.
चिंचवडगावातील, क्रांतीतीर्थ चापेकरवाडा राम मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button