breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर, खेड्यांपेक्षा शहरांमध्ये नोकऱ्यांची वानवा

नवी दिल्ली । महाईन्यूज ।विशेष प्रतिनिधी ।

अनेक जण नोकरी मिळेल या उद्देशाने शहरात येतात. मात्र आता शहरातच नोकऱ्या नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकीवर म्हणजेच 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात खेड्यांपेक्षा शहरांत नोकऱ्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन (सीएमआय) ने गुरुवारी याबाबत एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, शहरी भारतातील बेरोजगारीचा दर ग्रामीण भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे. शहरी भारतात बेरोजगारीचा दर 8.96 टक्के होता, तर ग्रामीण भारतात 7.55 टक्के होता. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये शहरी बेरोजगारीचा दर 7.11 टक्के होता तर ग्रामीण बेरोजगारीचा दर 8.04 टक्के होता.

बेरोजगारीत हरियाणा टॉपवर
राज्यानुसार बोलायचे झाल्यास, हरियाणा बेरोजगारीच्या दराच्या बाबतीत पुन्हा एकदा अव्वल आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 30.6 टक्के नोंदवला गेला. त्यानंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक 24.5 टक्के बेरोजगारीची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारीचा दर 23.9 टक्के होता. तर बिहारमध्ये 17.3 टक्के आणि त्रिपुरामध्ये 14.5 टक्के आहे.

छत्तीसगडसह हे राज्ये प्रगतीवर
सर्वात कमी बेरोजगारी दराच्या बाबतीत छत्तीसगड आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये बेरोजगारीचा दर फक्त 0/1 टक्के आहे. नोव्हेंबर महिन्यातील बेरोजगारीचा दर उत्तराखंडमध्ये 1.2 टक्के, ओडिशामध्ये 1.6 टक्के, कर्नाटकमध्ये 1.8 टक्के आणि मेघालयमध्ये 2.1 टक्के होता. ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा दर 7.77 टक्के होता. सीएमआय डेटानुसार, त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.43 टक्के होता.

2022 मध्ये बेरोजगारीच्या दरात दरमहा चढउतार
मुंबईस्थित CMIE च्या डेटावर अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते बारकाईने लक्ष ठेवतात कारण सरकारकडून अर्थव्यवस्थेवरील मासिक डेटा जाहीर केला जात नाही. जागतिक मंदी आणि चलनवाढीची भीती असताना 2022 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर खालीलप्रमाणे नोंदवला गेला.

जानेवारी – 6.56%

फेब्रुवारी – 8.11%

मार्च – 7.57%

एप्रिल – 7.83%

मे – 7.14%

जून – 7.83%

जुलै – 6.83%

ऑगस्ट – 8.28%

सप्टेंबर – 6.43%

ऑक्टोबर – 7.77%

नोव्हेंबर – 8.0%

नोव्हेंबर महिन्यातील राज्यनिहाय बेरोजगारी दराची आकडेवारी
राज्य बेरोजगारीचा दर (%)

आंध्र प्रदेश 9.1

आसाम 14.0

बिहार 17.3

छत्तीसगड 0.1

दिल्ली 12.7

गोवा 13.6

गुजरात 2.5

हरियाणा 30.6

हिमाचल प्रदेश 8.1

जम्मू आणि काश्मीर 23.9

झारखंड 14.3

कर्नाटक 1.8

केरळ 5.9

मध्य प्रदेश 6.2

महाराष्ट्र 3.5

मेघालय 2.1

ओडिशा 1.6

पुडुचेरी 2.9

पंजाब 7.8

राजस्थान 24.5

तामिळनाडू 3.8

तेलंगणा 6.0

त्रिपुरा 14.5

उत्तर प्रदेश 4.1

उत्तराखंड 1.2

पश्चिम बंगाल 5.4

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button