breaking-newsमनोरंजन

प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी-मिताली राज

सध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारितही बायोपिक लवकरच येणार आहे. मितालीने स्वत: यासाठी हिरवा कंदील दाखवला असून या चित्रपटात देसी गर्ल प्रियांकाने आपली भूमिका साकारावी अशी इच्छाही तिने बोलून दाखवली आहे.

मिताली राजचं आत्मचरित्रही यावर्षांत प्रकाशित होणार आहे. तर दुसरीकडे मिताली राजच्या बायोपिकचंही काम सुरू आहे. मिताली स्वत: चित्रपटाच्या कथानकाकडे जातीनं लक्ष घालत आहे. ‘प्रियांका चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. तिच्यात आणि माझ्यात खूपच साम्य आहे त्यामुळे तिनं माझी भूमिका साकरली तर मला आवडेल. मात्र ही माझी इच्छा असून त्याबद्दल अंतिम निर्णय चित्रपट निर्माते घेतील’ असं मितालीनं स्पष्ट केलं आहे.

भारतीय क्रिकेटर्सवर आधारित ‘सचिन: अ बिलिअन ड्रिम’, ‘अजहर’, ‘एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी’ असे चित्रपट आले आहे. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. पण महिला क्रिकेटपटूवर आधारित हा पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियांकाने याआधी बॉक्सर मेरी कोम हिची भूमिकादेखील साकारली आहे. त्यामुळे मितालीच्या इच्छेचा मान राखत प्रियांका चित्रपटात काम करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button