breaking-news

नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

नागपूर | महाईन्यूज

नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केलेले आहे.

नागपूर शहरात १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान सर्वेक्षण सुरू राहील. या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर,महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरे सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील १२ शहरे सर्वेक्षणात सहभागी होत आहेत. आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल मानांकन प्राप्त व्हावे, याकरिता नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र्र शासनाने निश्चित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे प्रशासनास, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button