breaking-newsमनोरंजन

लोकप्रिय आर्टिस्ट आणि फोटोग्राफर राम कामत यांची आत्महत्या

मुंबई – लोकप्रिय आर्टिस्ट आणि छायाचित्रकार राम इंद्रनील कामत यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. ४१ वर्षांच्या राम कामत यांचा बाथटबमध्ये पडलेला मृतदेह पोलिसांना सापडला. मृत्यूपूर्वी त्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. मात्र त्यांनी त्यात आत्महत्येचे कारण दिलेले नाही आणि आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरलेले नाही.

राम कामत माटुंग्यात आईसोबत राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावाखाली होते. राम कामत हे व्यवसायिक चित्रकार होते. त्यांची ग्लास पेंटिंग मुंबईतील कला क्षेत्रात प्रसिद्ध होती. ते चांगले फोटोग्राफरही होते. असे असताना त्यांच्या झालेल्या अशाप्रकारच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. राम कामत यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत असून त्यांच्या कुटुंबीयांचीही ते चौकशी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button