breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

देश ‘तालिबानी’ पद्धतीने चालवता येणार नाही : संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या समर्थनात उतरले असल्याचे दिसत आहे. “अभिनेत्री आणि तिच्या चित्रपटावर बहिष्काराची मागणी करणे चुकीचे आहे. देश तालिबानी पद्धतीने चालवता येणार नाही.” असे संजय राऊत यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थांना मारहाण झाल्याची घटना घडलेली होती, यानंतर दीपिका पदुकोन हिने जेएनयूमध्ये जाऊन येथील विद्यार्थांच्या भावना समजून घेतल्या होत्या, तेव्हापासून तिला भाजपासह अन्य काही संघटनाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी देखील दीपिकावर टीक करत तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.तर दुसरीकडे दीपिकाने जेएनयूला भेट दिल्याबद्दल अन्य संघटनांकडून तिचे कौतुक देखील केले गेले आहे. काहींनी डाव्या विचारसरणीला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्यावर टीका केली आहे. तर काहींनी हा केवळ छपाक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हणत नाव देखील घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button