breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांची बाजारात खरेदीसाठी झुंबड, ‘सोशल डिस्टंसिंग’चा फज्जा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन जाहिर केला. लॉकडाऊन दरम्यान दहा दिवस घराबाहेर पडता येणार नाही, याच्या भीतीपोटी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. डी-मार्ट, सुपर मार्केट, किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांसमोर ग्राहकांच्या अक्षरशा रांगा लागल्या आहेत.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दर दिवसाला 500 हून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या मनामध्ये एकप्रकारची भिती निर्माण झाली आहे. तथापि, लोक आपापल्या कामाला नेहमीप्रमाणे सुरूवात करतच आहेत. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला आहे. कार्यक्रम घेतले जात आहेत. कार्यक्रमात 20 नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा ओलांडून असंख्य लोकांची उपस्थिती होत आहे. परिणामी, कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही संख्या आटोक्यात आणणे प्रशासनापुढील आव्हान बनले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार (दि. 13) पासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान, कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. या भीतीपोटी नागरिकांची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडालेली आहे. किराणा मालाच्या दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. काळेवाडी आणि चिंचवड डी-मार्टच्या समोर प्रचंड मोठी रांग लागलेली आहे. पिंपरी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. काळेवाडी, चिंचवड भागात देखील काही दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. तब्बल एक तास रांगेत उभारल्यानंतर डी-मार्टमध्ये प्रवेश मिळत आहे. सामाजिक अंतर ठेवल्याचे कुठेही पाहायला मिळत नसल्याने परिस्थीती आणखीन विदारक बनत चालली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button