breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उड्डाणपुल रस्ता दुभाजक सुशोभिकरण करा

पिंपरी –  मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपूल रस्ता दुभाजक सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य  दिनेश यादव यांनी  अतिरिक्त आयुक्त प्रवीण  आष्टीकर यांच्याकडे  लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

 दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोईफाटा ते पवारवस्ती उड्डाणपूल रस्त्यावरील दुभाजकाचे सुशोभीकरण केलेले नाही. सुशोभीकरण केले नसल्यामुळे रस्त्यावरुन गाडी चालविताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहन चालविताना गाडीचा फोकस जास्त असतो. त्यामुळे  गाडीचालविणा-या व्यक्तीच्या डोळ्यावर पडून गाडी चालविण्यास त्रास होत आहे. तरी रस्त्यावरील दुभाजकाचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात यावे.  यावेळी तात्यासाहेब सपकाळ , दीपक घन, रोहित जगताप आदी उपस्थित होते
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button