breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

पत्नीला ट्रॅक करणे किंवा पतीची हेरगिरीची ऑफर, गुगलने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली | गुगलकडून जाहिरात धोरण अपडेट करण्यात आले आहे. आता तुम्हाला पतीची हेरगिरी करण्यासाठी किंवा पत्नीचा फोन ट्रॅक करण्यासाठी दिसत असलेल्या जाहिराती आता गुगलवर दिसणार नाहीत. गुगलने या नवीन धोरणाची घोषणा केली आहे. कंपनी अशा प्रोडक्ट किंवा अशा सर्विसेजच्या जाहिरातीला सपोर्ट करणार नाही.

कोणाच्याही परवानगीविना त्यांना ट्रॅक करणे, किंवा मॉनिटर करणे यासारख्या ऑफर्स या जाहिरातीमधून देण्यात येत होत्या. गुगले स्पष्ट केले की, नवीन नियम स्पायवेयर आणि पार्टनरच्या सर्विलान्सचा वापर करणाऱ्या टेक्नोलॉजीवर हा नियम लागू होणार आहे. टेक्स्ट मेसेज, कॉल्स आणि ब्राऊझिंग हिस्ट्री मॉनिटर करणाऱ्या टूल्स सुद्धा या कॅटेगरीत येतील.

सर्च इंजिन कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, जीपीएस ट्रॅकर आपल्या मार्केटिंग विना लोकांना त्यांची हेरगिरी करणारे दावे करीत आहेत. यासारख्या जाहिराती आता गुगलवर दिसणार नाहीत. त्यामुळे ऑडियो रिकॉर्ड्स, कॅमेरा, डॅश कॅमेरा आणि स्पाय कॅमेरा येतात. यासाठी कोणत्याही टेक्नोलॉजीला हेरगिरी संबंधित मार्केटिंग केली जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button