breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लॉकडाऊनचा कालावधी वाढणार?पंतप्रधान मोदी देशवासियांना करणार पुन्हा एकदा संबोधित

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली… आणि ही लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना शनिवारी पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपू्र्ण बदल होण्याची शक्यता आहे. आवश्यक सेवा वगळून आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आर्थिक मंदीचा विचार करता काही विशिष्ट्य क्षेत्रातील उद्योगांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. 

कोरोना विषाणूमुळे देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे… याबाबत रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण अहवालात म्हटले आहे.  लॉकडाऊनमुळे विमान वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाच्या पालनासह देशातील हवाई वाहतुकीला परवानगी मिळू शकते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button