breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनावर अभियंते आणि डॉक्टरांनी एकत्रित संशोधन करावे – डॉ. मकरंद जावडेकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संगणक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, संरक्षण अशा बहुतांशी सर्व क्षेत्रांसह आरोग्य क्षेत्रात देखील आता संगणकाचा व रोबोटचा वापर केला जात आहे. चीनमध्ये उद्‌भवलेल्या ‘कोरोना’च्या समस्यावर अभियंते आणि डॉक्टरांनी एकत्रित संशोधन करावे. त्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्ता, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून ‘कोरोना’सह भविष्यात उद्‌भवणा-या अशा वैश्विक आरोग्य समस्यांवर उपाय शोधणे शक्य आहे, असा आशावाद अमेरिकेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. मकरंद जावडेकर यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जावडेकर बोलत होते. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जावडेकर म्हणाले की, मानवाच्या व्यक्तिमत्व विकासात आहार – विहाराबरोबरच मन, बुध्दी आणि आरोग्य देखील महत्वाचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञानात आणखी संशोधन झाल्यास मानव प्रगतीचा आणखी मोठा टप्पा पार करेल. जगाला भेडसावणा-या पाणी, आरोग्य, पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्ती यावर अभियंतेच विजय मिळवतील अशी खात्री आहे, असेही डॉ. जावडेकर म्हणाले.

विश्वस्त भाईजान काझी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, पीसीसीओईआरने अल्पावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नावलौकिक कमावला आहे. यामध्ये पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाबरोबरच प्राध्यापक वर्गाचे देखील मोठे योगदान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button