breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोवीस तास पाण्याचा बट्ट्याबोळ, दोन वेळा मुदतवाढ देवून काम अपुर्णच

  • ठेकेदारांला 3 कोटी 40 लाखांचा दंड
  • अधिका-यांचे दुर्लक्ष, पाणी पुरवठ्यांचे काम संथगतीने सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. शहरातील 40 टक्के भागात योजनेच्या कामाची निर्धारीत मुदत संपली आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ देवूनही काम पुर्ण केलेले नाही. सध्यस्थिती केवळ 40 टक्के काम पुर्ण केले. त्यामुळे कामात दिरंगाई केल्याने महापालिकेने ठेकेदाराकडून सुमारे 3 कोटी 40 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.  बिलाच्या रकमेतून दंड वसूल करण्यात येणार असून  र्वरित काम त्याच ठेकेदाराकडून पुर्ण केले जाणार आहे. दरम्यान, पाणी पुरवठा अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे सदरील काम रेंगाळले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात ४० टक्के भागासाठी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामाची निविदा 217 कोटी रुपयांची होती. परंतु, ठेकेदाराला 207 कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले होते. कामाची मुदत दोन वर्षांची होती. कामाला सुरुवात 19 जून 2016 मध्ये झाली होती. तर जुलै-२०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे महापालिकेने ठरविले होते.

त्यानुसार काम 18 जून 2018 ला काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, निर्धारित मुदतीत ठेकेदाराकडून काम पुर्ण झालेले नाही. दोन वर्षात केवळ 30 टक्के त्यानंतर मुदतवाढ दिल्यानंतर 10 टक्के असे एकूण 40 टक्के काम पुर्ण केले आहे. त्यामुळे या ठेकेदाराला महापालिकेने दंड आकारणी सुरु केली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत पालिकेने या ठेकेदाराकडून तब्बल 3 कोटी 40 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कामात हलगर्जीपणा केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तरतूद महापालिकेने ठेवली आहे.

 

  • चोवीस तास पाण्याचे किती दिवस चालणार? 

शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रामुख्याने चिंचवड, केशवनगर, यमुनानगर, प्रेमलोक पार्क, अजमेरा कॉलनी, दिघी गावठाण, प्राधिकरण, बोऱ्हाडेवाडी, पेठ क्रमांक ७ आणि १०, इंद्रायणीनगर, थेरगाव, सांगवी, रावेत (पेठ क्रमांक २९), त्रिवेणीनगर आदी परिसरात आहे. यासाठी नव्या जलवाहिन्या टाकणे, मीटर बसविणे, पाणीपुरवठा नलिका बदलणे अशी विविध कामे मे. ‘विश्‍वराज इन्फ्रा’ यांच्याकडे हे सोपविलेले आहे.  काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या कामातंर्गत निगडी जलशुद्धीकरण केंद्र ते डांगे चौक अशा ७.६४ किलोमीटर अंतरात एक हजार मि.मी. व्यासाची डीआय जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button