breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

लायसन्स आणि RC बूक सोबत नसतानाही करू शकणार ड्रायव्हिंग

कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो. वाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की पहिल्यांदा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. यामुळे प्रत्येक वाहनचालकाला ही कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागते. पण आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. डिजिटल स्वरुपात (मोबाईलमध्ये) ही कागदपत्रे वाहनचालकाजवळ असतील, तर त्याला पोलिसांना दाखवता येऊ शकतील.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी मोटार वाहन कायदा १९८९ नुसार डिजीटल स्वरूपात कागदपत्रे दाखवता येतील असा अध्यादेश काढला आहे. यासाठी ‘डिजिलॉकर’ सुविधेची सुरुवात करण्यात येत आहे. रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या मोबाईललाही जोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे जतन केलेली आपली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होण्याबरोबरच आयुष्यभर सुरक्षित राहणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स किंवा गाडीची इतर कागदपत्रांची दुसरी पत्र यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल लॉकरचा वापर, खाते सुरू कसे कराल?
डिजीलॉकर’ या संकेतस्थळावर जाऊन किंवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते. डाऊनलोड झाल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून या अ‍ॅपवर लॉग इन करता येते. आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित नागरिकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. तो अ‍ॅपवर भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते. https://digilocker.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button